राज्यात 30 ऑगस्टपर्यंत अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता: पंजाब डख.

पंजाब डख हवामान अंदाज

पंजाब डख यांनी 25 ऑगस्ट रोजी सांगितले की राज्यातील शेतकऱ्यांनी येत्या 27 तारखेपर्यंत शेतातील कामे आवरून घ्यावीत. 27 तारखेपर्यंत राज्यात सूर्यदर्शन होत राहील तसेच वाराही सुरू राहील.

🔴राज्यात 27 ऑगस्ट नंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होईल. राज्यात 27 तारखेला पूर्व विदर्भातील जिल्हे जसे की नागपूर वर्धा भंडारा चंद्रपूर अमरावती बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली नांदेड पर्यंत पाऊस पडेल. 27 तारखेनंतर हळूहळू पाऊस मराठवाड्याकडे सरकेल

😲28 तारखेला पूर विदर्भाचे सहा जिल्हे पश्चिम विदर्भाचे जिल्हे त्याचबरोबर नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा त्याच्यानंतर धाराशिव संभाजीनगर बुलढाणा सोलापूर जळगाव पर्यंत पाऊस पडेल.

🔴सांगली सातारा कोल्हापूर अहिल्यानगर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव या पट्ट्यात 28 ऑगस्ट च्या दरम्यान पाऊस पडेल. हा पाऊस मागच्या पावसाळा मोठा असणार नाही. बऱ्याच ठिकाणी हलक्या सरे पडतील तर काही एक ठिकाणी मुसळधार पाऊसही पडेल.

🔴30 ऑगस्ट रोजी नागपूर वर्धा हिंगोली भंडारा, लातूर, जालना, बुलढाणा, अकोला या जिल्ह्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे.

हा पाऊस विदर्भात जास्त असणार आहे, मराठवाड्यातही पडेल.

सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की,

ज्यांची फवारणी वगैरे राहिली आहे त्यांनी तत्काळ करून घ्या कोळपणे वगैरे राहिली असेल तर 27 तारखेचा आधी आवरून घ्या, खते घालू शकता जेणेकरून 27 तारखेनंतर पावसात खते विरघळतील.