व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

राज्यामध्ये अवकाळी पाऊस बरसणार | पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज.

पंजाब डख हवामान अंदाज: राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचा हवामान अंदाज समोर आलेला आहे. हा हवामान अंदाज अवकाळी पावसा संदर्भात व कडाक्याच्या उन्हा संदर्भात आहे. जर पाहायला गेले तर गेल्या काही दिवसांपासून हवामानामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये खाल होतात व बऱ्याच शेतकऱ्यांचे या बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर व डिसेंबर महिन्या मधील अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांच्या पिकांना खूप मोठा फटका बसलेला आहे. अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामा मधील पहिल्या टप्प्यात असणाऱ्या पिकांवर खूप विपरीत परिणाम झालेला दिसत आहे. तसेच चालू वर्षाची देखील सुरुवात अवकाळी पावसाने झाली यावेळी हरभरा व गहू अशा थंडीमध्ये चांगल्या वाढणारे पिकांचे नुकसान झाले.

मागील काही दिवसांमधील अवकाळी पावसामुळे द्राक्ष डाळिंब तसेच कांदा अशा पिकांचे देखील नुकसान खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेले आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी ज्या त्यावेळी शेतकऱ्यांना अवकाळी पावसाने सावध केले. गेल्या काही दिवसांपासून राज्यांमधील हवामान हे कोरडे आहे. पण आता पुढील काही दिवसात राज्यातील हवामानामध्ये बदल झालेला दिसून येईल.

जिल्हा नुसार पुढील चार दिवसांचा हवामान अंदाज पाहण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा. 👇

हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी असे त्यांनी आवाहन केलेले आहे.

कुठे व कधी बरसणार अवकाळी पाऊस.

पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीनुसार आज पासून दोन-तीन दिवस म्हणजेच 10 फेब्रुवारीपर्यंत हवामान मुख्यतः कोरडे राहील. १० तारखेपर्यंत महाराष्ट्र मध्ये कुठेही पाऊस पडणार नाही.

मात्र १० तारखे नंतर महाराष्ट्र मधील काही ठिकाणी हवामानामध्ये मोठा बदल होणार आहे. 10 फेब्रुवारी नंतर राज्यांमधील तापमानामध्ये व हवामानामध्ये बदल होऊन राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस बरसणार आहे.असा अंदाज आहे.

11 फेब्रुवारी पासून 14 फेब्रुवारी पर्यंत अवकाळी पाऊस बरसणार आहे. यावेळी काही जिल्ह्यांमध्ये गारपीट देखील होणार आहे.

पंजाबराव डख यांचे हवामान अंदाज एप्लीकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.👇

अवकाळी पाऊस कुठे पडणार

पंजाबराव डोक्यांनी सांगितल्याप्रमाणे 11 फेब्रुवारीपासून 14 फेब्रुवारी पर्यंत काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडणार आहे.

या कालावधीमध्ये राज्यातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मुख्यतः पाऊस पडणार आहे. जिल्ह्यातील काही ठिकाणी गारपीट ही पडेल.

याशिवाय अमरावती, अकोला, चांदूरबाजार, वाशिम, अकोट, पुसद, हिंगोली, परभणी, बुलढाणा, जळगाव, छत्रपती संभाजी नगर येथेही अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यात उर्वरित ठिकाणी तापमानात वाढ होणार

येत्या काही दिवसात तापमानात वाढ होत जाईल असा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तविला आहे. या हवामान वाढीचा फायदा द्राक्ष शेतकऱ्यांना व टरबूज, खरबूज शेतकऱ्यांना होणार आहे.

Live सॅटेलाइट नकाशा

Leave a Comment