पंजाब डख हवामान अंदाज 2 जुलै.

सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा अंदाज:

3 जुलै पासून 9 जुलै पर्यंत महाराष्ट्र मध्ये भाग बदलत पाऊस पडायला सुरुवात -पंजाब डख

उद्यापासून म्हणजेच सोमवार दिनांक 3 जुलै पासून ९ जुलै पर्यंत पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाग बदलत पाऊस पडायला सुरुवात होणार आहे.

???? मागील अंदाजामध्ये आपण असे सांगितले होते की दिनांक चोवीस जून पासून 29 जून पर्यंत पाऊस पडेल तर यावेळी पाऊस पडला पण हा पाऊस सर्व दूर पडला नाही. त्यामुळे 50 टक्के शेतकऱ्यांची पेरणी पूर्ण झाली, पण बाकी शेतकऱ्यांची पेरणी ही रखडली होती.

???? तर या 3 ते 9 जुलै च्या पावसामध्ये अजून बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या पेरण्यात या पूर्ण होऊन जातील. पण हा पाऊस सर्व दूर नसल्याने जर काही शेतकऱ्यांच्या पेरण्या राहिल्या तर,

????????️ १३ जुलै ते 17 जुलै पर्यंत पुन्हा महाराष्ट्र मध्ये पाऊस पडेल व राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या पेरण्या या पूर्ण होतील.

???? सध्याचे जोराचे वारे वाहत आहे हे दोन जुलैपासून वाहने थांबेल. आज पासून वारे हे पूर्णपणे थांबल्यानंतर जे बाष्प वाऱ्यामुळे वाहून जात होते हे बंद होईल व सोमवार 3 जुलै पासून महाराष्ट्रात पाऊस चालू होईल.

सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की, ????

जमिनीमध्ये एक इतभर ओल झाल्याशिवाय पेरणी करू नये पेरणीचा निर्णय स्वतः घ्यावा .


???? शेतकऱ्यांनी पाऊस पडला नाही म्हणून जास्त घाबरू नये. येत्या काळामध्ये चांगला पाऊस आपल्या महाराष्ट्रामध्ये पडेल. जिथे चांगला पाउस झाला तिथे पेरण्या झाल्या काही भागात पाउस नाही तिथे पेरण्या राहील्या आहेत तरी पण 15 जुलै पर्यंत राज्यात पाउस पडेल व पेरण्या मार्गी लागतील .

दोन जुलै नंतर सोलापूर मध्ये जोरदार पाऊस होईल

https://youtu.be/_EzZyd2ZxAA

सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की,


????यावर्षी शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. यावर्षी राज्यामध्ये दुष्काळ पडणार नाही. राज्यामध्ये पाऊस होईल. यामुळे सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये.

???? शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की वेळ ,ठिकाण, दिशा ,बदलते माहीत असावे.

नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा) ,02/07/2023

Live सॅटेलाइट नकाशा

Leave a Comment